
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांना गेल्या तीन दिवसांपासून धमकीचे फोन येत आहेत. काही जणांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला सुनावले आहे. तसेच राज राजापूरकर यांच्या जिविताला धोका असल्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे. तसेच त्यांना धमक्या देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांना गेल्या तीन दिवसांपासून धमकीचे फोन येत आहेत. काही जणांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. महाराष्ट्रात विरोधी विचारांचा देखील सन्मान करण्याची…
— Supriya Sule (@supriya_sule) September 22, 2025
याबाबत सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांना गेल्या तीन दिवसांपासून धमकीचे फोन येत आहेत. काही जणांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. महाराष्ट्रात विरोधी विचारांचा देखील सन्मान करण्याची आणि विचारांचा प्रतिवाद विचारांनीच करण्याची मोठी परंपरा आहे.या परंपरेला छेद देणाऱ्या गोष्टी राज्यात सातत्याने घडत आहेत, याचे दुःख वाटते. माझी राज्य शासनाला विनंती आहे की, कृपया राज राजापूरकर यांच्या जिविताला धोका असल्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे. तसेच त्यांना धमक्या देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद करत राज राजापूरकर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.