यंदा 98 टक्के पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
monsoon-in-maharashtra

स्कायमेटपाठोपाठ हवामान खात्यानेही खूशखबर दिली आहे. यंदाही मान्सून चांगला राहणार असून सरासरी 98 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यंदा अल् निनोचा परिणामही कमी जाणवेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने यंदा देशात 103 टक्के पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ आज हवामान खात्यानेही सरासरीच्या 98 टक्के पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे. मान्सूनच्या वाटचालीवर अल् निनो वा ला निनोचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.