थिविम आणि करमाळी स्थानकांदरम्यान बोगद्यात पाणी शिरलं, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण आणि गोवा परिसरात सध्या तुफान पाऊस असून त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरच्या थिविम आणि करमाळी या दोन स्थानकांदरम्यान असलेल्या बोगद्यात पाणी शिरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सततच्या पावसाने या बोगद्यात पाणी शिरलं आहे. पाण्याने वाहून आलेली मातीही ट्रॅकवर साचली आहे. त्यामुळे त्या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा विविध स्थानकांवर खोळंबा झाला आहे.

नेत्रावती एक्सप्रेसला थिविम स्थानकातच थांबा देण्यात आला असून थिविमआधी येणाऱ्या पेडणे रेल्वे स्थानकावर वास्को-पटना ही ट्रेन थांबून आहे. सध्या ही माती हटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.