
अतिवृष्टीमुळे राज्यातील 36 लाख 11 हजार एकर जमिनीवरील शेती उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. 29 जिह्यांतील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यापैकी 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले 12 जिल्हे आहेत. 15 ते 20 ऑगस्टदरम्यान पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
एकूण बाधित जिल्हे
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशीव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.
सर्वाधिक बाधित जिल्हे
नांदेड – 6,20,566 हेक्टर
वाशीम – 1,64,557 हेक्टर
यवतमाळ – 1,64,932 हेक्टर
धाराशीव – 150,753 हेक्टर
बुलढाणा – 89,782 हेक्टर
अकोला – 43,828 हेक्टर
सोलापूर – 47,266 हेक्टर
हिंगोली – 40,000 हेक्टर
बाधित पिके
सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद