नक्षलवाद्यांची धमकी; गडचिरोलीत रस्ते आणि पूल बांधाल तर याद राखा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

गडचिरोली जिह्यात सुरू असलेली पूल, रस्ते बांधणीची कामे बंद करा अशी धमकी नक्षलवाद्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील बॅनर व पोस्टर्स लावून ही धमकी देण्यात आली आहे. गडचिरोलीत सुरू असलेली कामे थांबली नाहीत तर असे धमाके होतच राहतील असा इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे.

 भांडवलदारांची चमचेगिरी करणाऱयांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाने गडचिरोलीत 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर 26 एप्रिल 2019ला रामको नारकोटी हिचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. या दोन्ही घटनांचा निषेध नक्षलवाद्यांनी केला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे.