बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला. जर पैसे दिले नाही तर बाबा सिद्दिकी याच्यापेक्षा वाईट अवस्था होईल, असे त्या मेसेजमध्ये नमूद होते. पोलीस त्या मेसेजची सत्यता पडताळत आहेत.
अभिनेता सलमान खानला बिष्णोई टोळीकडून वारंवार धमकीचे मेसेज सुरूच आहेत. मे महिन्यात सलमान खानच्या घरावरदेखील गोळीबार झाला होता. गोळीबारानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. नुकताच वाहतूक पोलिसांना व्हॉट्स अप मेसेज आला. मेसेजद्वारे अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयाची खंडणी मागितली गेली. जर पाच कोटी रुपयांची खंडणी न दिली गेल्यास माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था होईल, असे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे.
नुकतेच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली होती. हत्येनंतर सलमान खानला धमकीचे मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचे असले आणि लॉरेन्स बिष्णोईसोबत वैर संपवायचे असेल तर 5 कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाही तर वाईट परिमाण होतील, असे त्यात नमूद असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.