ताडपत्रीमध्ये गुंडाळून बैलाचे मांस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक

jail-1

सामना प्रतिनिधी । जालना

छोटा हत्ती वाहनामध्ये बैलाचे मांस घेऊन जाणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 13 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींची नावे शेख इरफान शेख मोहम्मंद हनीफ, जुबेर महेबुब कुरेशी व जावेद महेबुब कुरेशी अशी आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुषंगाने अंबड चौफुली व रेवगाव फाट्यावर पोलिसांनी सापळा रचला. दुपारी 2 च्या सुमारास छोटा हत्ती वाहनास बैलाचे मांस घेऊन जाताना पोलिसांनी पकडले. यावेळी 600 किलोचे मांस काळ्या व पांढऱ्या रंगाच्या ताडपत्रीमध्ये गुंडाळलेले मिळून आले. जनावरांच्या मासांबाबत जावेद महेबुब कुरेशी याची विचारपूस केली असता, हे मांस बैलाचे असल्याचे सांगितले. गोवंश हत्या करून त्याचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने बदनापुरहून मंठ्यात घेवून जात असल्याचे त्याने सांगितले. याबाबत कदीम जालना पोलीस ठाण्यात वरिल तिघांविरूद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम 2015 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वायकोस यांना पाचरण करण्यात आले. वरिल जप्त मांस नगर परिषद जालना यांच्या मदतीने नियमानुससार नाश करण्यात आले.

दरम्यान, ही कार्यवाही पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या