तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने सोमवारी तीन सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल यांची बदली नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर गोयल यांच्या जागी डॉ. संजय चहांदे यांची नियुक्ती झाली आहे. बालाजी मंजुळे यांची बदली मंत्रालयात नियोजन विभागाच्या उपसचिवपदी करण्यात आली आहे.