
राज्य सरकारने आज भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. वित्त आणि नियोजन विभागाच्या सचिव ए. शैला यांची बदली मंत्रालयात वस्त्राsद्योग विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे, तर मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची बदली महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांची नेमणूक पर्यटन विभागाच्या संचालकपदी करण्यात आली आहे.






























































