
फेडएक्स कॉर्पची उपकंपनी आणि जगातल्या सर्वात मोठय़ा एक्प्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या फेडएक्स एक्प्रेसने टी/गेल्फ ज्युनियर अचिव्हमेंट (जेए) इंडिया यांच्या सहयोगाने हिंदुस्थानात पहिली फेडएक्स/ जेए इंटरनॅशनल ट्रेड चॅलेंज स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये 25 शाळांमधील 450 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यशाळेत संवादात्मक अध्ययन सत्र, प्रेरणादायी व्याख्यानं, फेडएक्स, टीगेल्फ/जेए इंडियामधल्या मार्गदर्शकांशी संवाद आणि आर्थिक बाबी, पुरवठाशास्त्र, जागतिक व्यापार याविषयी उद्योगक्षेत्रातील तज्ञांचे विचार या गोष्टींचा समावेश होता. प्रादेशिक पातळीवर सहभागी होण्यासाठी निवडण्यात आलेले तीन विद्यार्थी संघ प्रिंगडेल स्कूल, नवी दिल्ली, लर्निंग पाथ स्कूल, मोहाली आणि पद्म शेषाद्री बाल भवन सीनियर सेकंडरी स्कूल, चेन्नई हे आहेत. हे संघ ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशिया पॅसिफिक इंटरनॅशनल ट्रेड चॅलेंज स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


























































