लग्नाला बोलावले नाही म्हणून केला गोळीबार, वरपक्षात पसरली शोककळा

1106

लग्नाला बोलावले नाही या रागात तीन व्यक्तींनी वरपक्षाला धडा शिकविण्यासाठी लग्नात अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात नवऱ्या मुलाच्या काकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. या प्रकरणी हरेंद्र, गुड्डू व बल्ली या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते तिघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ग्वालियरमधील बिलारा गावातील एका तरुणाचे लग्न होते. गावातीलच मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी संपूर्ण गावाला मेजवाणीही होती. मात्र या मेजवाणीला गावातील तीन गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींना आमंत्रण नव्हतं. आमंत्रण नसूनही ते लग्नाला आले व त्यांनी भरपेट जेवण केले. लग्नात गोंधळ नको म्हणून वरपक्षाकडील मंडळींनी त्यांना शांतपणे तेथून जाण्यास सांगितले. ते तिघे निघूनही गेले

मात्र लग्नाला बोलावले नसल्याचा राग त्या तिघांच्याही पोटात खदखदत होता. त्यामुळे ते पुन्हा लग्नात आले व त्यांनी पाहुण्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी नवऱ्या मुलाच्या काकाला लागली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या