जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आले आहे.

जम्मू कश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. तेव्हा शोपियन जिल्ह्यातील सुगन भागात सुरक्षा दलाने शोध मोहीम राबवली. तेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलानेही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाने दहशदवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधीही दिली. परंतु दहशतवादी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मंगळवारी रात्री उशिरा ही चकमक थांबली. नंतर बुधावारी पहाटे पुन्हा गोळीबार सुरू झाला. त्यात तीन दहशतावादी मारले गेले.

साजद अहमद मल्ला हा दहशदावी हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेचा होता. तर वसीम अहमद, जुनैद रशीद वनी हे दोन दहशतवादी अल बदर संघटनेचे असल्याचे समोर आले आहे.