केरळमध्ये तीन वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागण, इटलीहून परतले होते कुटुंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Coronavirus scare
प्रातिनिधिक फोटो

हिंदुस्थानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये एका तीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. हा मुलगा नुकतंच आपल्या कुटुंबीयांसोबत इटलीहून परतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार इटलीहून एक कुटुंबीय केरळमध्ये आले होते. त्यातील सर्वांची चाचणी घेण्यात आली. टेस्ट पॉसिटीव्ह निघाल्यानंतर सर्व कुटुंबीयांना कोचीच्या एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. त्यापैकी तीन वर्षाच्या मुलामध्ये कोरोनाचे विषाणू आढळले आहे.

रविवारी केरळमधील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. 7 मार्च रोजी हे कुटुंब इटलीहून परतले होते. सर्व रुग्णांना पथानामथिट्टा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पाच पैकी तीन लोक इटलीहून परतले होते. त्यांच्या सानिध्यात राहिल्याने इतर दोघांनाही या विषाणूची लागण झाली.

हिंदुस्थानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 40 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे केरळचे आहेत. सर्वात आधी केरळहून तीन रुग्ण आढळले होते त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर हिंदुस्थानात या ऍलर्ट वाढवण्यात आला. प्रत्येक विमानतळावर परदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

केरळमध्ये कोरोना नंतर स्वाईन फ्लूचे सावट आहे. कोझीकोडे जिल्ह्याच्या काही भागात बर्ड फ्लू असल्याचे समोर आले आहे. कोडियाठूर भागात काही ठिकाणी मृत कोंबड्या आढळल्या होत्या. त्यांचे नमूने तपासल्यानंतर बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

कोझोकोडेच्या एक किमी भागात सर्व कोंबड्यांना मारण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. बर्ड फ्लू रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील अशी माहिती आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी दिली आहे. हा बर्ड फ्लू इतर भागत पसरणार नाही यासाठीही प्रशासन काळजी घेत आहे.

‘कोरोना’चा प्रसार वाढू नये यासाठी दिल्लीत बैठका पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आढावा बैठक घेतली होती. कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशात 52 प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले होते.