मोठय़ा पिछाडीनंतर इंग्लंडने हिंदुस्थानला 4-4 असे रोखले, पुरुष हॉकीत थरारक लढत अखेर अनिर्णित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठय़ा आघाडीनंतर अखेरच्या सत्रात ढिलाई दाखवून प्रतिस्पर्धी संघाला आपल्या गोलक्षेत्रात मुसंडी मारू देण्याची हिंदुस्थानी परंपरा आपल्या हॉकी संघाने कायम राखली. त्यामुळेच 1-3 अशा पिछाडीनंतर यजमान इंग्लंड हॉकी संघाने पुरुष गटातील  थरारक लढतीत हिंदुस्थानला 4-4 असे बरोबरीत रोखले. चौथ्या सत्राच्या खेळापर्यंत हिंदुस्थान ही लढत जिंकणार असे वातावरण होते. पण थोडीशी ढिलाई हिंदुस्थानला नडली. इंग्लंडच्या फॉरवर्डसनी या सत्रात 3 गोल नोंदवत अखेर ही लढत बरोबरीत सोडवली.

दुबळय़ा घाना संघाला 11-0 असे उद्ध्वस्त करणाऱया हिंदुस्थानी हॉकी संघाने आज यजमान इंग्लंड संघाविरुद्ध सुरुवात अतिशय आक्रमक केली. पहिली तीन सत्रे (क्वार्टर्स ) हिंदुस्थानी फॉरवर्डसनी गाजवली. या तीन सत्रांत हिंदुस्थानने 3-1 अशी मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केले होते. हिंदुस्थानच्या वतीने मंदीपसिंगने 2 तर ललित उपाध्याय आणि हरमनप्रीतने 1-1 गोलची नोंद केली. चौथ्या सत्रात मात्र इंग्लंडच्या आक्रमक खेळाडूंनी हिंदुस्थानी बचावपटूंच्या ढिलाईचा लाभ घेत 3 गोल नोंदवत लढतीत बरोबरी साधली.