पहिल्यांदाच थिएटरमध्ये एडिट होणार आमीरचा ‘ठग्स’

52

सामना ऑनलाईन । मुंबई

यशराज प्रॉडक्शनच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाची आतापासूनच सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटानिमित्ताने महानायक अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमीर खान पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलीवूडच्या या बिग सिनेमासाठी एडिटिंगच्या नियमांतही बदल करण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे एखादा सिनेमा छोट्या मॉनिटरवर एडिट केला जातो. त्यानंतर तो मोठय़ा स्क्रीनवर तपासला जातो, परंतु ‘ठग्स’ हा सिनेमा चक्क प्रिह्यूव थिएटरमध्येच एडिट केला जाणार आहे. बॉलीवूडमध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. प्रेक्षकांना भव्यदिव्य दृष्यानुभव देण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या