असं झालं तर – डिमॅट अकाऊंट बंद/निक्रिय झाले…

डिमॅट अकाऊंट बंद झाले असेल तर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमच्या ब्रोकरशी संपर्क साधा, आवश्यक फॉर्म भरा, ओटीपी व्हेरिफिकेशन करा.

जुन्या अकाऊंटमध्ये काही शेअर्स असल्यास ते ट्रान्सफर करा किंवा विका. जास्त काळ बंद असल्यास केवायसी पुन्हा करावे लागू शकते.

डिमॅट अकाऊंट खूप दिवस वापर न केल्यास निक्रिय होते. काही अपूर्ण व्यवहार असल्यास अकाऊंट बंद होते. पॅनकार्ड किंवा इतर माहितीमध्ये त्रुटी असल्यास ते बंद होते.

काही ब्रोकर निक्रिय अकाऊंटवर कारवाई करतात. तुमच्या ब्रोकरच्या ग्राहक सेवेला कॉल करा किंवा ई-मेल पाठवा. खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी अर्ज भरा.

अकाऊंट बंद झाल्यावर तुम्ही शेअर्सची खरेदी-विक्री करू शकत नाही. त्यामुळे ब्रोकरशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी लागेल.