
हवामानातील बदल, लिपस्टिकचा अतिवापर, कॉफी-चहाचे अतिसेवन आणि धूम्रपानामुळे ओठ काळे पडतात. जर ओठ काळे पडले असतील तर घरगुती उपाय करून ओठ गुलाबी रंगाचे आणि मऊ करता येऊ शकतात. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी नारळाचे तेल फायदेशीर ठरते.
ओठांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. हळद आणि दुधाचे मिश्रण करून ते ओठांवर नियमित लावल्यास ओठांचा काळेपणा दूर होण्यास मदत होते. ओठांवर नियमित गाईचे तूप लावल्यास ओठ मऊ होतात. तसेच ओठांवरचा काळेपणा दूर होतो.