घरचा वैद्य टीप्स

  • काही लोकांना सतत पोटदुखीचा त्रास होत असतो. पोटदुखीमुळे केसांवर परिणाम होऊन केस गळतीची समस्या निर्माण होते. या दोन्ही समस्यांपासून वाचण्यासाठी सकाळी अनशेपोटी एक वेलची कोमट पाण्यासोबत खायची. काही दिवस हे सातत्याने केल्यास पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल.  
  • सुक्या अंजिरामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त असते. त्याने हाडे मजबूत होतात. गुडघेदुखीमुळे त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित तीन ते चार सुकलेले अंजीर खावेत. फरक जाणवेल.
  • रात्री झोपण्यापूर्वी भाजलेले चणे खाऊन कपभर गरम दूध प्यावे. त्याने श्वसननलिका स्वच्छ होऊन दम्याच्या त्रासावर आराम मिळतो.
  • तापावर ओवा अत्यंत गुणकारी मानला जातो. थंडी वाजून ताप येत असल्यास पाऊण चमचा ओवा सकाळ-संध्याकाळ गरम पाण्यासोबत घेतल्यास ताप लवकर उतरण्यास मदत होते.
  • जर ताप, थंडी आणि खोकला झाला असल्यास एक कप पाण्यात तीन तुळशीची पाने आणि दोन आल्याचे तुकडे घालून ते पाणी उकळवा. उकळल्यावर एका कपात ते पाणी गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस आणि दोन चमचे मध घालून दिवसातून दोनदा प्या. लवकर आराम मिळेल.  
  • अपचनाचा त्रास होत असल्यास एक चमचा बडिशेप आणि थोडी साखर एकत्र करून खावी. अपचनाचा त्रास होणार नाही. जेवणानंतर थोडी बडिशेप  खाल्ल्यास पचन चांगले होते.
  • डोकेदुखीचा त्रास असल्यास तुळशीचा रस नाकपुड्यांमध्ये घातल्यास आराम मिळतो.
  • नियमित रात्री झोपताना नाकपुड्यांमध्ये दोन दोन थेंब कोमट गाईचे तूप घाला.  झोप चांगली येईल, घोरण्याची समस्या दूर होईल आणि अनेक आजारांपासून आराम मिळेल.
  • रात्री झोपताना साखर घातलेल्या दुधात एक चमचा तूप घालून प्यायल्यास थकवा दूर होतो, झोप चांगली लागते, हाडे मजबूत होतात आणि शौचास साफ होते.
  • रोज सकाळी नाश्ता करण्याच्या अर्धा तास आधी अर्धा चमचा लिंबाच्या रसात अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल घालून प्या. यकृत चांगले राहते. जाडेपणावरही हे गुणकारी आहे.
आपली प्रतिक्रिया द्या