
– उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे, उत्तरेकडे डोके ठेवून कधीही झोपू नये. पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षण शक्तीचा उलट प्रवाह डोक्यावर आणि मनावर होतो. तब्येतीच्या दृष्टीने तो चांगला नाही. त्यामुळे पूर्वेला आणि दक्षिणेला डोकं करून झोपणारी व्यक्ती नेहमीच उत्साही आणि यशस्वी होते.
– बेडरुममध्ये बिछान्यासमोर आरसा किंवा आरसा असलेले कपाट ठेवू नये. त्याने घरात आजार वाढतात.
– निरोगी आरोग्यासाठी बॉक्स बेडवर झोपण्यापेक्षा सतरंजीवर झोपलेले केव्हाही चांगले. बॉक्स बेडवर झोपल्याने आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
– घरात कायम खेळीमेळीचे वातावरण राहण्यासाठी घरात केव्हाही फुटलेले आरसे, फुटलेली खेळणी, तुटलेले फर्निचर घरात ठेवू नये. त्याने घरात दूषित वातावरण होईल.
– गतिमान आयुष्य हवे असेल तर बंद पडलेले घडय़ाळ घरामध्ये ठेऊ नये.
– झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बिछाना असावा म्हणजे चांगले आरोग्य आणि ऐश्वर्य मिळते.
– नवीन घर घेताना ते वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही हे पाहून विकत घेतले तर सुख-समृद्धी आणि आरोग्य मिळते.
– नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी.





























































