
पाठीत, पोटात सतत दुखणे,भूक कमी लागणे, सतत उलटी आणि चक्कर येणे, बद्धकोष्ठता होणे, लघवी करताना वेदना होणे, थंडी वाजणे… ही ऍपेंडिक्सची लक्षणे असू शकतात. या आजारापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय…
- दररोज दिवसातून कमीत कमी दोन वेळा आल्याचा चहा प्यावा. यामुळे ऍपेंडिक्समुळे होणारी वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होते.
- पालक सूप किंवा पालकची भाजी खावी. यामुळे आतडय़ातील ऍपेंडिक्समुळे आलेली सूज कमी होते. शिवाय अनेक आजारांपासून रक्षण होते.
- जेवणाअगोदर एका पिकलेल्या टोमॅटोच्या फोडींवर सैंदव मीठ घालून खावा. यामुळे काही दिवसांतच पोटदुखी ओणि सूज यापासून आराम मिळेल.
- सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची काही पाने चावून खावी. पोटदुखी बरी होते.
- ताकात काळे मीठ घालून प्यावे. ऍपेंडिक्समुळे होणारी पोटदुखी थांबते.
- रोज रिकाम्या पोटी 2-3 कच्चे लसूण खा. नक्की फायदा होईल.
- 1 कप पाण्यात दोन चमचे मेथी घालून हे पाणी उकळवा. हे पाणी दिवसातून एकदा प्या. जेवणातही मेथीचा समावेश करा. यामुळे दुखणे, सूज कमी होईल.
- अपचन, दुखणे यावर लिंबू हा रामबाण उपाय आहे. लिंबात जीवनसत्त्व क मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. लिंबाच्या रसात मध मिसळा. हे मिश्रण काही आठवडे नियमित घ्या.




























































