
सामना ऑनलाईन । लंडन
म्हैसूरचे शासक टिपू सुलतानच्या काही शस्त्रांचा नुकताच लंडनमध्ये लिलाव करण्यात आला. या सर्व शस्त्रांना 1, 07,000 पौडांची किंमत मिळाली. सर्वात जास्त किंमत चांदीने मढवलेल्या फ्लिंटलॉक बंदुकीला मिळाली. या बंदुकीसाठी एकूण 14 जणांनी बोली लावली होती. सर्वाधिक बोली 60 हजार पौडांची लागली. तसेच टिपू सुलतानच्या सुवर्णजडित तलवारीला 18,500 पौडांची सर्वाधिक बोली लागली. या लिलावात एकूण 58 बोली लावण्यात आल्या.
टिपू सुलतान यांचा 1799 च्या श्रीरंगपट्टनम येथील लढाईत मत्यू झाला होता. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे मेजर थॉमस हार्ट टिपू सुलतानची काही शस्त्रे स्वतःसोबत घेऊन गेले होते. त्यापैकी काही शस्त्रांचा लिलाव करण्यात आला आहे.


























































