
सामना ऑनलाईन | कोलकाता
प्रचाराचा आणि उष्णतेचा पारा चांगलाच तापला आहे. अशावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवी कल्पना घेऊन प्रचार करत आहेत. ऊन वाढल्यामुळे पश्चिम बंगालच्या एका उमेदवाराने नवीन शक्कल लढवली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे उमेदवार आणि ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी प्रचारासाठी आपला पुतळा पाठवला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
To avoid scorching heat, TMC Diamond Harbour Candidate & Mamata’s Nephew Abhishek Banerjee found an innovative solution
– Using his own statute for Campaigning pic.twitter.com/ZaRAG55gcZ— Rishi Bagree (@rishibagree) April 26, 2019
ऊन वाढले आहे परंतु या वेळी प्रचार करणेही गरजेचे आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी याला उपाय म्हणून प्रचारासाठी आपला पुतळा पाठवला आहे. कार्यकर्त्यांनी बॅनर्जी यांचा पुतळा जिपमध्ये ठेवला आहे आणि घोषणा देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकर्यांच्या त्यांच्या या कल्पनेची प्रशंसा केली आहे. तसेच बॅनर्जी निवडणूकीत हरले तर त्यांनी हा स्टार्ट अप सुरू करावा असा टोलाही लगावला आहे.



























































