मत नाही तर वीज, पाणी नाही; तृणमूल काँग्रेस मंत्र्याची उघड धमकी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. राज्यातील सर्व नेते आणि मंत्री सभा घेऊन मतदारांना आवाहन करत आहेत. पण राज्याचे कृषीमंत्री यांनी मतदारांना उघड धमकी दिली असून आम्हाला मत नाही दिले तर तुम्हाला वीज आणि पाणी मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री तपन दासगुप्ता हे हुगळीमध्ये एका सभेत बोलत होते. दासगुप्ता म्हणाले की, ज्या भागातून मला मतं मिळणार नाही त्या भागात वीज आणि पाणी पोहोचणार नाही. त्यांनी भाजपकडे जावे असेही दासगुप्ता म्हणाले आहेत.

तपन दासगुप्ता 2011 साली हुगळीच्या सप्तग्राम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. 2016 साली त्यांनी पुन्हा या मतदरासंघातून विजय मिळाला. आता 2021 मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून उभे आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने मतदारांना धमकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आमदार हमीदुल रहमान यांनीही अशाच प्रकारे मतदारांना धमकावत म्हटले होते की जे कोणी गद्दार असतील त्यांना निवडणुकीनंतर धडा शिकवला जाईल.

तसेच मुख्यमंत्री मतमा बॅनर्जी यांच्या योजनेचा प्रत्येकाला लाभ मिळाला आहे. तृणमूलला मत द्या नाहीतर माकप किंवा भाजपच्या बाजूने उभे रहा. जो कोणी गद्दारी करेल त्याला धडा शिकवला जाईल असे रहिमान म्हणाले होते. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओही व्हयरल झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या