दप्तराच्या ओझ्याचा आज होणार सर्व्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची पाहणी करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. हा सर्व्हे गुरुवारीच पूर्ण करण्याच्या सूचना संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

केंद्र सरकारने राज्यातील 50 शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा सर्व्हे करण्याबाबतच्या सूचना संचालनालयाला दिल्या आहेत. हा सर्व्हे करण्यासाठी केंद्र सरकारने गुगल फॉर्मच्या तीन लिंक दिल्या आहेत. यामध्ये मुख्याध्यापकांना विचारावयाची प्रश्नावली, पालकांना विचारावयाची प्रश्नावली, विद्यार्थ्यांना विचारावयाची प्रश्नावली अशा तीन लिंक दिल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकाचे मत, प्रत्येक शाळेतील पाच पालक आणि पाच विद्यार्थ्यांचे मत यामध्ये जाणून घेण्यात येणार आहे. राज्यातील 50 शाळांचा सर्व्हे करण्यात येणार असून यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांचा समावेश करण्यात आला आहे.