
विक्रोळी येथील यशोदीप फाऊंडेशनच्यावतीने नरसिंह अली व अभिमन्यू घाडीगावकर यांच्या स्मरणार्थ शनिवार 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबिरात मधुमेह, थायरॉईड, हिमोग्लोबिन, संधीवात, पायांची संवेदना, नेत्रचिकित्सा, हाडांचा ठिसूळपणा या तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. नाव नोंदणीसाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश सोनमळे यांच्याशी 9773683455 या क्रमांकावर संपर्क साधावा.



























































