
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक जिंकण्याची हिंदुस्थानची संधी हुकली. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत 22 वर्षीय दिपक पूनिया याचा माईल्स अमिनो याने 4-2 असा पराभव केला.
हिंदुस्थानचा कुस्तीपटू दिपक पूनिया याने सुरुवातीला चांगला खेळ करत 2 पॉइंट मिळवले आणि आघाडी घेतली. मात्र यानंतर माईनल्स अमिनो याने एक पॉइंट घेत आघाडी कमी केली. मध्यांतरापर्यंत दिपककडे 2-1 अशी आघाडी होती. मात्र मध्यातरानंतर दिपकने डिफेन्सीव्ह गेम केला आणि यातच तो फसला.
अखेरच्या क्षणी माईनल्स अमिनो याने 2 पॉइंट घेत 3-2 अशी आघाडी घेतली. या दरम्यान हिंदुस्थानने पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र हे आव्हान फेटाळून लावण्यात आल्याने हिंदुस्थानने आणखी एक पॉइंट आणि सामनाही गमावला.
Tokyo Olympic पदकाच्या आशांना सुरुंग, ‘वर्ल्ड नं. 1’ विनेश फोगट ऑलिम्पिकमधून बाहेर
रवीकुमारला रौप्यपदक
तत्पूर्वी 57 किलो वजनी गटामध्ये झालेल्या अंतिम लढतीत रवीकुमार दहिया याला पराभव सहन करावा लागला. या पराभवामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रवीकुमारचा रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावुर युगुऐव या कुस्तीपटूने 7-4 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.




























































