जगातील ‘या’ 10 देशांमध्ये सर्वाधिक सोने, जाणून घ्या हिंदुस्थान कितव्या क्रमांकावर आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्याचा साठा हा प्रत्येक देशाची महत्त्वाची संपत्ती आहे. आर्थिक संकटाच्या वेळी सोने उपयोगी पडू शकते. जाणून घेऊया, जगातील अशा 10 देशांबद्दल ज्यांच्याकडे सर्वाधिक सोने आहे. मुख्य म्हणजे या 10 देशांच्या यादीत हिंदुस्थानचाही समावेश करण्यात आला आहे.

सोन्याच्या दराने आजच्या काळात उच्चांक गाठला आहे. जगातील सर्वच देश सोन्याचा साठा करतात. सोन्याचा साठा हा प्रत्येक देशाची महत्त्वाची संपत्ती आहे. अलीकडेच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ट्विटरवर जगभरातील देशांकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याची यादी प्रसिद्ध केली आहे.

या यादीत अमेरिकेचे नाव जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून सोन्याच्या साठ्याच्या यादीत अव्वल ठरले आहे. 8,133 मेट्रिक टन सोन्यासह, त्यांच्याकडे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. जर्मनीकडे 3,355 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. अशा प्रकारे सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत जर्मनी दुसऱ्या स्थानावर आहे. युरोपीय देश इटली सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात 2,452 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. फ्रान्स चौथ्या क्रमांकावर आहे. त्यात 2,437 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. या यादीत रशिया सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यात 2,299 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. 2,011 मेट्रिक टन सोन्याच्या साठ्यासह चीन या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 1,040 मेट्रिक टन सोन्याच्या साठ्यासह स्वित्झर्लंड सातव्या क्रमांकावर आहे. सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत जपान आठव्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 846 मेट्रिक टन सोने आहे.

हिंदुस्थान कितव्या स्थानावर ?
या यादीत हिंदुस्थान नवव्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानकडे 787 MT सोन्याचा साठा आहे. 612 मेट्रिक टन सोन्याच्या साठ्यासह नेदरलँड 10व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडे फक्त 64मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.