पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड, कुख्यात दहशतवादी औरंगजेबचं पाकिस्तानमध्ये अज्ञातांकडून अपहरण

जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा कुख्यात दहशतवादी मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर (Mohiuddin Aurangzeb Alamgir) याचे पाकिस्तानमध्ये अज्ञात लोकांनी अपहरण केले आहे. पाकिस्तानातील हाफिजाबाद (Hafizabad) येथून त्याचे अपहरण करण्यात आल्याची माहिती ‘टाइम्स अल्जेब्रा’ने दिली आहे. 2019मध्ये जम्मू-कश्मीरमधील पुलवामा (Pulwama) येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मोहिउद्दीन मास्टरमाइंड आहे.

मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर हा डेरा हाजी गुलाम (Dera Haji Ghulam) येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होता. याच दरम्यान अज्ञात लोकांनी कारमधून त्याचे अपहरण केले. पोलिसांनी निर्जन स्थळी औरंगजेबची दुचाकी सापडली असून त्याचा शोध सुरू आहे.


दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षभरापासून दहशतवाद्यांचा अज्ञातांकडून खात्मा सुरू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला, उधमपूरमधील हल्ला, दिल्लीतील संसदेवरील हल्ल्यात सहभागी अनेक दहशतवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे.