अमेरिकेत वादळामुळे मोठी हानी; 100 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली आहे. चक्रीवादळामुळे पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून शनिवारी 100 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे चक्रीवादळ असल्याचे सांगण्यात येत आहे. या वादळाने मोफील्डसारख्या अनेक छोट्या शहरांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.

या वादळाने मोफील्ड शहरातील मेणबत्तीचा कारखाना आणि एक नर्सिंगहोम पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. तर जवळच असलेल्या अॅमेझॉनच्या गोदामाील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की, एक ट्रेन रुळांवरून उतरली आहे. कँटकीपासून सुरू झालेल्या या वादळआने अमेरिकेतील पाच राज्यांना तडाखा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली आहे.

अमेरिकेच्या इतिहासातील हे मोठे वादळ आहे. ही सर्वात मोठी नेसर्गिक आपत्ती असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. या वादाळात झालेल्या नुकसानीची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, शनिवारी इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबून 100 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पाच राज्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळाचा फटका बसलेल्या भागात बचाव दलाचे मदत कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.