कामगार कायद्यातील बदलांविरोधात संघटनांचा एल्गार, 2 ऑगस्ट रोजी निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
workers-union

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांविरोधात कामगार संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबई जिल्हाधिकारी वांद्रे कार्यालयावर निदर्शन मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबईतील वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार संघटनांकडून निदर्शने करण्यात येणार असून विविध कंपन्यांमधील कामगार संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. सिमेन्स कामगार संघटना देखील यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती या कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.