शिवराज्यभिषेक सोहळ्याला आलेल्या शिवभक्तांमुळे रायगड घाटात वाहतुक कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रायगड

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा याचि देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज रायगडाच्या दिशेने रवाना झाले. मात्र शिवभक्तांच्या वाहनांमुळे कोझर- रायगड घाटात प्रचंड वाहतुक कोंडी झाली. त्यामुळे अनेक शिवभक्त रस्त्यातच अडकले होते. या घाटातील वाहतूक पूर्णपणे थांबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. साडे नऊच्या सुमारास शिवराज्यभिषेकास सुरुवात होणार असून अद्याप अनेक शिवभक्त वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत.