रेल्वेने प्रवास करताय? थोडं थांबा, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ‘या’ ट्रेनचे वेळापत्रक बदलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नागपूर – आमला आणि बडनेरा – अमरावती मेमू सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

1.  नागपूर – आमला मेमू पॅसेंजर

01203 मेमू ट्रेन दि. 15.7.22 पासून दररोज 09.10 वाजता नागपूर येथून निघेल आणि आमला येथे त्याच दिवशी 13.00 वाजता  पोहोचेल.

01204 मेमू ट्रेन दि. 15.7.22 पासून आमला येथून दररोज 13.30 वाजता  निघेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 17.50 वाजता  पोहोचेल.

या गाडीला गोधनी, भरतवाडा, कळमेश्वर, कोहली, सोनखांब, मेटपांजरा, काटोल, कळंभा, तिनखेडा, नारखेड, दारीमेटा, पांढुर्णा, तीगाव, घुंडनखापा, चिचोंडा, हातनापूर, मुलताई आणि जौलखेडा असे थांबे दिले आहेत.

2.  बडनेरा – अमरावती मेमू

01377 मेमू ट्रेन दि. 15.7.22 पासून बडनेरा येथून दररोज 01.30 वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी 01.45 वाजता  पोहोचेल.

01378 मेमू ट्रेन दि. 15.7.22 पासून अमरावती येथून दररोज 03.55 वाजता सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी 04.10 वाजता  पोहोचेल.

01375 मेमू ट्रेन दि. 15.7.22 पासून बडनेरा येथून दररोज 22.55 वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी 23.10 वाजता पोहोचेल.

01376 मेमू ट्रेन दि. 15.7.22 पासून अमरावती येथून दररोज 23.40 वाजता सुटेल आणि बडनेरा येथे त्याच दिवशी 23.55 वाजता पोहोचेल.

3.  01323/01324 नागपूर – आमला मेमू च्या वेळेत बदल

01323 मेमू ट्रेन दि. 15.7.22 पासून दररोज 18.10 वाजता नागपूर येथून सुटेल आणि आमला येथे त्याच दिवशी 22.10 वाजता  पोहोचेल.

01324 मेमू ट्रेन दि. 15.7.22 पासून दररोज 04.10 वाजता आमला येथून सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 08.45 वाजता  पोहोचेल.

या मेमू ट्रेनच्या थांब्यांमध्ये आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही.