पोलीस भरतीसाठी संकेतस्थळावर तृतीयपंथीयासाठीही पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर  पोलीस भरती-2021 मध्ये तृतीयपंथीयांसाठी पोलिसांच्या संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पोलीस भरती- 2021मध्ये तृतीयपंथीयांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाबाबत 9 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानुसार या पोलीस भरतीमध्ये पोलीस रिक्रुटमेंट 2022 डॉट महाआयटी डॉट ओआरजी या संकेतस्थळावर तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा पर्याय पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदासाठी 13 डिसेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे  राज्याच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी एका पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.