टायर फुटल्याने खासगी ट्रव्हल्स उलटली, मोहोळमधील घटना; 11 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकहून सोलापूरला येणाऱ्या खासगी ट्रव्हल्सचे पुढचे टायर फुटल्याने ट्रव्हल्स उलटून 11 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील यावली फाटय़ाजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. कल्पना सुभाष जैन, दर्शना जैन, प्रफुल चव्हाण, जय पटेल, सुनील हगलुरे अशी जखमींची नावे आहेत.

नाशिक ते सोलापूर राजयोग ट्रव्हल्सच्या बसमध्ये 30 प्रवासी होते. सोलापूर-पुणे महामार्गावर ही बस आली असता, अचानक बसचे पुढचे टायर फुटले. यामुळे चालकाचा ताबा सुटून बस उलटली. यात बसमधील 11 प्रवासी जखमी झाले असून, त्यातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेच्या तीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यातील डॉक्टर आणि चालकांनी जखमींना बाहेर काढत त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.