
एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला डोक्यावर पदर घेऊन लक्झरी कार चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ @ndahiya_2026 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पंजाबी सूट परिधान केलेली ही महिला दिल्लीस्थित कंटेंट क्रिएटर ‘निक्की दहिया’ आहे. आलिशान गाडी आणि तिचा पारंपरिक पोशाख यांमधील विरोधाभास सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर देशी लूकमधील या महिलेवर नेटीझन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. “पुरुषांच्या क्षेत्रात महिलांचा दबदबा,” असे काहीजण म्हणत आहेत, तर काहींनी तिच्या शालीनतेचे कौतुक केले आहे. एकूणच हा व्हिडीओ नेटीझन्सच्या कमालीचा पसंतीस पडला आहे.


























































