
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या एका मराठमोळय़ा आजीबाईने धमाल केली आहे. या आजीच्या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. ही आजीबाई म्हणते की, तवा आम्ही चांगलं राहत होतो. तर काही नाही बोललो, गेली बया पळून… काही नाही बोललो, गेली बया पळून…अरे देवा…. या एवढय़ाच शब्दाने इन्स्टाग्रामवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे शब्द ट्रेंडमध्ये आले आहेत. शेकडो लोकांनी यावर रील बनवली आहे. यामध्ये तरुणींची मोठी संख्या आहे. गेल्या महिन्याभरापासून इन्स्टावर ही रील व्हायरल झाली असून आजीबाईचा फॅन वर्गही चांगलाच वाढला आहे.