सिंधुताईंना स्टोन आर्टमधून मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रत्येक जण हळहळला. अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना सुमन दाभोलकर या कलाकाराने स्टोन आर्ट साकारून त्यांना मानवंदना दिली आहे.

फाईन आर्टचे शिक्षण घेतलेले सुमन दाभोलकर गेल्या दीड वर्षांपासून स्टोन आर्ट कलाकृती साकारत आहेत. सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली येथे राहणारे सुमन नदीच्या पात्रातून दगड गोळा करतात. दगडाच्या आकारात कोणताही बदल न करता त्यावर पेंटिंग करतात. आतापर्यंत अनेक मोठमोठय़ा सेलिब्रेटींचे स्टोन आर्ट त्यांनी केले आहे. मंगळवारी सिंधुताईंच्या निधनाचे वृत्त समजताच अवघ्या दोन तासांत सुमन यांनी हुबेहूब सिंधुताईंचे स्टोन आर्ट तयार कले. त्यासाठी गावच्या नदीतील दगडाचा वापर केला.

याविषयी सुमन म्हणाले, सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःचे आयुष्य अनाथ मुलांसाठी समर्पित केले. कोणताही कलाकार आपल्या कलेतून व्यक्त होत असतो. एक कलाकार म्हणून सिंधुताईंना आदरांजली
वाहण्याचा मी प्रयत्न केला.