कोरोना हा प्राणी, भाजप नेत्याचा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भयंकर बनले असताना उत्तराखंडमधील भाजपचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी शुक्रवारी वादग्रस्त विधान करून देशाच्या दुःखावर मीठ चोळले. कोरोनाही एक जीव आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांत त्यांनी जीवघेण्या विषाणूविषयीचा पोटातील कळवळा जगजाहीर केला. त्यांचे विधान सोशल मीडियात चांगलेच ट्रोल झाले.

आपण आपल्यालाच सर्वाधिक बुद्धिमान प्राणी समजत आहोत. आपण कोरोनाच्या मागे लागलो आहोत. परंतु विषाणूला जगायचे आहे. त्यामुळे तो वेळोवेळी रूप बदलत आहे. कोरोना बहुरुपी आहे. परिणामी, आपल्यालाच विषाणूपासून अंतर ठेवून चालावे लागेल, तेही वेगाने. जेणेकरून कोरोना विषाणू मागे राहील, असे विधान त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे.