ट्रकला बोलेरो धडकून पाच ठार; 11 जखमी, पंढरपूरच्या वेशीवरच भाविकांवर काळाचा घाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची बोलेरो जीप उभ्या असलेल्या ट्रकला धडकून भीषण अपघात झाला. यात पाचजण ठार, तर 11 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपूरच्या वेशीवरील कासेगाव शिवारात आज पहाटे ही घटना घडली आहे. अपघातातील मृत आणि जखमी कोल्हापूर जिह्यातील चंदगड आणि कर्नाटकातील आहेत.

सखाराम धोंडिबा लांबोर (वय 50), शांताबाई लक्ष्मण लांबोर (वय 62), पिंकी उर्फ सुनीता ज्ञानू लांबोर (वय 11), नगुबाई काळू लांबोर (वय 65, सर्व रा. धनगरवाडी, धामणे, जि. बेळगाव, कर्नाटक) आणि तुकाराम खंडू कदम (वय 50, रा. बादराई कडवळे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर, धोंडिबा बापू लांबोर, कोंडदेव बापू लांबोर, कोमल बापू लांबोर, बबन लांबोर, भारती बापू लांबोर, रोहित यशवंत कांबळे, बापू कल्लाप्पा लांबोर, कोंडिबा विठ्ठल लांबोर, बाबूलाल लांबोर, नगुबाई ज्ञानू कोकरे आणि धोंडिबा सखाराम डोईफोडे अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना सोलापूरला हलवण्यात आले आहे.

चंदगड आणि बेळगाव येथील काही भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत होते. पंढरपूरच्या वेशीवर असणाऱया कासेगाव शिवारात उभ्या असलेल्या ट्रकला या भाविकांची बोलेरो जीप धडकली. यात चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीचा उपचाराला घेऊन जाताना मृत्यू झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.