मुलायम ओठ करायचे असतील तर… हे करून पहा

ओठांना नैसर्गिक लालसरपणा आणण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. गुलाबाच्या पाकळ्या कुस्करून दुधात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण ओठांवर 10 ते 15 मिनिटे लावल्यास ओठांना नैसर्गिक गुलाबीपणा येतो. ओठावरचे काळे डाग निघून जाण्यास मदत होते. दुधात केशर आणि वेलची मिसळून त्याचे मिश्रण ओठांचे रंगद्रव्य कमी करण्यासाठी वापरल्यास ओठ मुलायम होतात.

लिंबाचा रससुद्धा ओठावर लावू शकतात. धूम्रपान आणि कॅफिनच्या अतिसेवनामुळे ओठ काळे पडू शकतात. त्यामुळे त्यांचे सेवन कमी करा. चहा आणि कॉफी प्यायल्यानेही ओठ काळे पडतात. ओठांसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये असलेली कठोर रसायने टाळा.