हे करून पहा तांदळात किडे होऊ नये म्हणून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुकानातून जास्त तांदूळ खरेदी केल्यानंतर काही कालांतराने तांदळात किडे तयार होतात, असा अनेकांचा अनुभव आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तांदळात किडे होऊ नये, तर यासाठी काही गोष्टी फॉलो करा. सर्वात आधी तांदूळ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा, म्हणजे किडे आत जाणार नाहीत आणि ओलावा टिकणार नाही.

शक्य असेल तर तांदूळ एक ते दोन आठवडय़ांनी उन्हात पसरवून पूर्णपणे वाळवा, ज्यामुळे तांदळातील ओलावा निघून जाईल. वाळवल्यावर थंड झाल्यावरच डब्यात ठेवा. डब्यात थोडं हिंग ठेवा. त्याच्या वासामुळे किडे दूर राहतात. 10 किलो तांदळासाठी अर्धी वाटी लवंग ठेवा. वास गेल्यावर बदला.