
तुर्कीने आपले पहिले हायपरसोनिक क्षेपणास्त्र तायफून ब्लॉक-4 लाँच केले आहे. इस्तंबूलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संरक्षण उद्योग मेळय़ात हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले.
हे नवे क्षेपणास्त्र तुर्कीच्या संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी रोकेत्सनने विकसित केले आहे. तुर्कीचे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तायफूनचे हे हायपरसोनिक मॉडेल आहे. पाकिस्तानचे तुर्कीशी असलेले संबंध पाहता, हे क्षेपणास्त्र भारताच्या चिंता वाढवू शकते. तुर्कीने कायमच हिंदुस्थानच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पाकिस्तान हे क्षेपणास्त्र तुर्कीकडून खरेदी करू शकतो. त्यामुळे हिंदुस्थानची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.