विमानात झाले जबरदस्त भांडण, प्रवाशाने चावले कर्मचाऱ्याचे बोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानात अनेकदा वाद होत असल्याचे समोर आले आहे. असेच विमानातील एक भांडण चर्चेचा विषय ठरले आहे. प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादात एका प्रवाशाने कर्मचाऱ्याचे बोट चावले. अखेर विमान इमरजन्सीमध्ये लॅन्डींग करावे लागेल.

ही घटना टर्किश एअरलाईन्स येथील आहे. आंतरराष्ट्रीय मीडिया वृत्तानुसार, हे विमान इस्टांबुलहून इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ता येथे जात होते. या उड्डाणाच्या मध्यभागी अनेक थांबे होते आणि अनेक ठिकाणी थांबावे लागत होते. मात्र जकार्ताला पोहोचण्यापूर्वी एक प्रवाशी विमान कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत होता, त्यावेळी कळले की तो दारूच्या नशेत होता.

ज्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केल्याने तो आणखीनच गोंधळला. यानंतर त्याने हद्दच पार केली. त्याने एका कर्मचाऱ्याचे बोट चावले. एवढेच नाही तर त्याने पाण्याच्या बाटल्या इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली. अखेर कुआलानामु आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाने आपत्कालीन लँडिंग केले.

हा प्रवासी कोणी सामान्य प्रवासी नव्हता. तो एअरवेजमधला वैमानिक होता, पण दारुच्या नशेत असल्यामुळे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही, असेही या अहवालात आहे. सध्या या प्रकरणानंतर त्या व्यक्तीला कुआलानामुमध्ये उतरविण्यात आले . त्याचवेळी विमान कंपन्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.