बंद असलेल्या बँक खात्याद्वारे कोट्यवधींची उलाढाल; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखादा व्यवसाय सुरू करताना ग्राहक बँकेत खाते उघडतात, पण काही काळानंतर त्याकडे दुर्लक्ष होते. खाते बंद पडते. याचाच फायदा घेऊन फसवणूकीचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. बंद असलेल्या खात्यातून तीन जणांनी कोट्यवधींची उलाढाल केली आहे.

गुजरातमधील सूरत येथील एका बँकेच्या बंद खात्यातून तीन जणांनी मिळून 11 कोटी रुपये काढल्याची घटना उघडकीस आली आहे. काही महिन्यांपूर्वीच व्यवसाय करण्याकरिता ही दोन खाती उघडण्यात आली होती, पण व्यवसाय बंद पडला आणि ही खाती वापरलीच गेली नाहीत. खातेदारांनीही याकडे दुर्लक्ष केले.

इनकमटॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आली तेव्हा दोन वेगवेगळ्या बंद पडलेल्या बँक खात्यातून एकूण 11 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे उघडकीस आले. तोपर्यंत या खात्यातून झालेल्या व्यवहाराबाबत खातेदारांना कोणतीच माहिती नव्हती. या फसवणूक प्रकरणी सायबर पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे. त्यांच्यावर 16 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका बँकेच्या शाखेतून कोट्यवधी रुपये लांबवण्याची योजना आरोपींनी केली होती. सुरुवातीला त्यांनी बँकेच्या खात्याशी संबंधित माहिती इमेलबाबत मिळवली. त्यानंतर ओटीपीकरिता नवीन नंबर अपडेट केला. त्यानंतर ते फंड ट्रासफर होण्याची वाट बघत होते, मात्र वेळीच ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांना पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.