ट्विटरचा ‘टिवटिवाट’ थांबला, जगभरातून तक्रारींचा पाऊस

twitter

कमी शब्दांमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी, फोटो आणि व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभरातील लोकांचे हक्काचे व्यासपीठ असणारे ट्विटरचा (Twitter) ‘टिवटिवाट’ डाऊन झाला आहे. बुधवारी जगभरात ट्विटरला पोस्ट शेअर करण्यात अडचण निर्माण झाली.

ट्विटर अकाऊंट ओपन करण्यास आणि ट्वीट करण्यात अडचण येत आहे. ट्विटर पेज ओपन झाल्यानंतर एरर (Error) येत आहे. Error पेज पर काही तरी चुकतंय (Something is technically wrong) असा मेसेज येत आहे. तसेच ही तुमची चूक नाही असेही ट्विटर सांगत आहे.

twitter

दरम्यान, ट्विटर डाऊन झाल्यामुळे युझर्सने ट्विटरकडे तक्रारींचा पाऊस पाडला आहे. हिंदुस्थान, जपान, ब्रिटन, पॅरीस, नेदरलँड या देशांमधून सर्वाधिक तक्रारी येत आहेत.कंपनीने लवकरच ही समस्या सोडवली जाईल असे सांगितले आहे. गेल्या एक तासापासून ट्विटर डाऊन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या