थोडक्यात – खऱ्या-खोट्या नोटांचा गोरखधंदा उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक लाखाच्या खऱ्या नोटा घेऊन मोबदल्यात दोन लाखांच्या बनावट नोटा देऊन त्याद्वारे अर्थव्यवस्थेला धक्का पोहचविण्याचे काम करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्या दोघांकडून 500 रुपये दराच्या एकूण दोन हजार 128 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत 10 लाख 64 हजार रुपये इतकी आहे.

व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

शेअर व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदाराने टेलिग्राम अॅप्सवर आलेली तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. चॅटिंग दरम्यान तिने त्यांना एकटय़ाला भेटण्यासाठी बोलावले. तरुणीचे नकोसे फोटो पाहिले आहेत. जर पैसे दिले नाहीत तर सोशल मीडियावर बदनामी केली जाईल असे धमकावत 18 लाख 50 हजार रुपये उकळले. त्यानंतरही आणखी पैशाची मागणी होत असल्याने त्यांनी मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

लोखंडी सळईवर पडून कारपेंटरचा मृत्यू

बांधकामाच्या ठिकाणी काम करताना लोखंडी सळईवर पडून कारपेंटरचा मृत्य झाला. सौरभकुमार निषाद असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी कंत्राटदार आणि सुपरवायझरविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सौरभकुमार हा गोरेगाव येथील बांधकामाच्या ठिकाणी कारपेंटर म्हणून काम करत होता. शनिवारी सायंकाळी सौरभ हा इमारतीच्या चौदा मजल्यावर काम करत होता. टायर रॉड उचलत असताना तो खाली पडला. लोखंडी सळईवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार एका कामगाराच्या लक्षात आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.