
देशी बनावटीची आठ पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे विकण्यासाठी मध्य प्रदेशमधून मुंबईत आलेल्या दोघांनाही गुन्हे शाखेच्या युनिट 7च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून अडीच लाखांची शस्त्रs जप्त केली.
दोन इसम शस्त्रास्त्रs विकण्यासाठी विक्रोळी परिसरात येणार असल्याची खबर युनिट 7चे प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. त्यानुसार श्रीधनकर यांनी एपीआय आनंद बगाडे, अमोगसिद्ध ओलेकर आदींच्या पथकासह विक्रोळी पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्गावर सापळा रचला. खबरीने दिलेल्या माहितीनुसार दोन इसम त्या ठिकाणी आले. ते दोघे कोणाची तरी वाट पाहत उभे असताना बगाडे व पथकाने त्यांच्यावर झडप घातली. त्यावेळी एकाच्या पाठीवर असलेल्या सॅक बॅगेत आठ देशी बनावटीची पिस्तुले सापडली तर दुसऱयाच्या पॅण्टच्या खिशात आठ जिवंत काडतुसे सापडली. यासिन रमजान खान (20) आणि अजहर आझम खान (22) अशी दोघांची नावे असून ते मूळचे मध्य प्रदेशच्या अमननगर येथील रहिवासी आहेत. यातील एक आरोपी मुंबईत यापूर्वी बेकरीत कामाला होता. त्यांनी ही शस्त्रs कोणाला विकायला आणली होती याचा शोध सुरू असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
































































