
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाहेर (आयएसएस) शुक्रवारी दोघा अंतराळवीरांनी विद्युत पुरवठा यंत्रणा अपग्रेड करण्यासाठी स्पेसवॉक केला. आयएसएसच्या बाहेर येऊन पृथ्वीच्यावर 410 किलोमीटर अंतरावर त्यांनी स्पेसवॉक करून रोल आऊट सोलर ऍरे बसवण्याचे काम पूर्ण केले.
युरोपीय अंतराळ एजन्सीचे थॉमस पेस्केट आणि नासाचे शेन किम्ब्रू अशी स्पेसवॉक करणाऱया दोघा अंतराळवीरांची नावे आहेत. नासाने स्पेसवॉकचा खास व्हिडियो ट्विटरवर शेअर करत ‘‘या दृश्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे,’’ असा प्रश्न विचारणारे ट्विट केले. या व्हिडियोत थॉमस पेस्केट याची झलक दिसतेय. त्याच्या मागे श्वास रोखून धरायला लावणारी पृथ्वी दिसतेय. या स्पेसवॉकचे थेट प्रसारण करण्यात आले होते. अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाबाहेर येऊन रोल आऊट सोलार ऍरे इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण केले.


























































