
केज तालुक्यातील साळेगावमध्ये पाण्याने भरलेल्या खदणीत बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने चिंचोली माळी गावात शोककळा पसरली आहे.
केज तालुक्यातील साळेगावमधील दस्तगीर माळ भागात खदान आहे. या ठिकाणी अनिल बबन शिंदे व प्रकाश बबन शिंदे (रा. चिंचोली माळी) हे सख्खे भाऊ शुक्रवारी सायंकाळी खदानीकडे गेले होते. मात्र, ते घरी परतले नसल्याने त्यांचा शोध घेण्यात आला.
त्यावेळी या दोन्ही मुलांचे मृतदेह खदानीच्या पाण्यात तरंगताना दिसले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदानासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. ही दोन्ही मुले खादनीकडे का गेली गेली होती. तसेच खदानीत बुडून त्यांचा मृत्यू कसा झाला, याबाबतची माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



























































