
माण नदीतील विहिरीत बुडून दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे घडली आहे.
मगर बापू मस्के, विश्वनाथ रंगनाथ पुजारी (रा. ढवळस, ता. मंगळवेढा), मगर मस्के व विश्वनाथ पुजारी हे मित्रासह माण नदीत असलेल्या एका विहिरीत पोहण्यास गेले होते. मगर मस्के हा अर्धांगवायूमुळे अपंग होता, तरीही त्याने विहिरीत पोहण्यासाठी म्हणून उडी मारली; परंतु तो बाहेर आला नाही. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी विश्वनाथने पाण्यात उडी मारली. मात्र, तोही पाण्यात बुडाला. दोघेही वर न आल्याने इतर मित्रांनी गावात येऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली असून, हेडकॉन्स्टेबल सुनील गायकवाड तपास करीत आहेत.


























































